chhatrapati shivaji maharaj, Udayanraje Bhosale, satara saam tv
महाराष्ट्र

Udayanraje : त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, ताे चिटूर...; उदयनराजेंची भाजप नेत्यांवर टीका (पाहा व्हिडिओ)

निर्धार शिवसन्मानाचा यास आज साता-यात उदयनराजेंनी प्रारंभ करीत रायगडावर प्रयाण केले.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असे आज (शुक्रवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी स्पष्ट केले. निर्धार शिवसन्मानाचा अशी भुमिका घेत किल्ले रायगडावर जाण्यापुर्वी उदयनराजेंनी (udayanraje bhosale news) साता-यात (satara) माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी भाजप नेते नरेंद्र पाटील यांच्या वक्तव्यावर देखील उदयनराजेंनी टीका केली. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा (shivendraraje bhosale) उल्लेख टाळत समाचार घेतला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी बाेलताना जाणता राजा तर संपूर्ण विश्वात एकच छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची उंची आणि त्या व्यक्तीशी कधीच तुलना होऊ शकत नाही त्यांच्या काही कार्याची नक्की तुलना होऊ शकते परंतु छत्रपतींशी तुलना करणे हे अयोग्य आहे असे म्हटलं हाेते.

त्यावर आज उदयनराजेंना माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता उदयनराजे म्हणाले नरेंद्र पाटील (narendra patil) हे थोर विचारवंत असतील किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही असेही खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले.

दरम्यान मी लढणारा आहे रडणारा नाही. मला ही भावना आहेत. त्या व्यक्त करताना मी भावविवश झालाे. परंतु काेणी तरी चिटूर म्हणाला ते रडाहेत असे म्हणत उदयनराजेंनी मला वेदना हाेताहेत असे उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंचा उल्लेख टाळत नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT