Udayanraje Bhosale News, Maharashtra Political crisis News,
Udayanraje Bhosale News, Maharashtra Political crisis News,  Saam Tv
महाराष्ट्र

साता-याच्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उदयनराजेंची दिल्लीतून प्रतिक्रिया, म्हणाले...!

Siddharth Latkar

दिल्ली : शिवसेनेचे नेते (Shivsena) नगरविकास मंत्री (Eknath Shinde) आणि अन्य आमदारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील (maharashtra) महाविकास आघाडीचे (mva) सरकार काेसळणार याची चर्चा देशभरात (india) सुरु आहे. यावर खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही असे म्हटले. उदयनराजे हे साताराहून नुकतेच दिल्लीत गेले आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Udayanraje Bhosale Latest Marathi News)

उदयनराजे भाेसले म्हणाले माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना काेणतेही अमिष दाखविण्याची गरज नसती. परंत भिन्न विचारांच्या लाेक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. वेगवेगळी विचारधारेचे लाेक एकत्र आले. त्यामुळे त्यांना अमिष दाखवावे लागले. असाे. (Maharashtra Political crisis News)

अन्य पक्षांच्या पक्ष श्रेष्ठींवर मी भाष्य करणार नाही परंतु त्यांनी त्यावेळी त्यांनी एकत्र येताना विचार करायला हवा हाेता. मुळात हे टिकणार ते किती दिवस टिकणार. लाेकांना वेळ दिला जात नाही पक्ष श्रेष्ठींकडून. काम हाेत नाही. असे हाेत असताना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लागणार आहेत. या सर्व निवडणुकांना सामाेरे जावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे विराेधक काेण आहेत तर राष्ट्रवादी काॅंग्रेेस आणि काॅंग्रेस. त्यामुऴे ही समीकरण जुळणार नव्हती. ती जुळवली गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी, बारामतीत काय घडतंय?

Nashik Lok Sabha: नाशिक जिल्ह्यातील'या' दिग्गज उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांची नोटीस, काय आहे नेमकं प्रकरण?

योगा केल्यानंतर प्या Health Drinks, आरोग्य राहील निरोगी

Solapur Lok Sabha Votting Live: भाजप आमदार सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर सडकून टीका

Petrol Diesel Price Today: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्रातील भाव

SCROLL FOR NEXT