Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Kass Pathar, Kass Mahotsav
Udayanraje Bhosale , Shivendraraje Bhosale, Satara , Kass Pathar, Kass Mahotsav saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : पैशाशिवाय त्यांना दुसरं काही सूचत नाही; उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर

Siddharth Latkar, ओंकार कदम

Kass Pathar : जे माझ्यावर टीका करताहेत त्यांचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जात नाही. माझं मुख्य प्रचारक म्हणून ते आहेत. कदाचित आरशा समाेर मी उभं राहिलाे तर मी माझं नाव विसरेन पण ते नाही असं मत खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी कास महाेत्सवावरुन (Kass Mahotsav) आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (shivendraraje bhosale) केलेल्या टीकेला उत्तर देताना व्यक्त केले. (Breaking Marathi News)

आजपासून तीन दिवस सातारा जिल्हाधिकारी, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या वतीने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावरुन काही सामाजिक कार्यकर्त्यांसह लाेकप्रतिनिधींनी आक्षेप नाेंदविले आहेत. या ठिकाणी वृक्ष तोड देखील झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत तीव्र नाराजी पसरली आहे. सातारा जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनीही या महाेत्सवाबाबतच्या आयाेजनात काही चुकीच्या गाेष्टी घडल्या असल्याचे म्हटलं आहे. त्याबाबतची तक्रार शासनाकडे करणार असल्याचे आमदार भाेसले यांनी नमूद केले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या टीकेवर आज माध्यमांनी उदयनराजेंना छेडलं असता त्यांनी हा महाेत्सव शासनाने आयाेजित केला आहे. पैसा शासनाचा, स्टाॅल धारक या भागातील. यामध्ये माझा काय संबंध काय असे म्हटलं.

उदयनराजे म्हणाले मी फक्त पुढाकार घेतला. ही कल्पना दुस-याला काेणाला का सूचली नाही. माझं तर असं म्हणणे आहे ज्यांनी या संपुर्ण परिसरात झाडं ताेडली त्यांच्यावर कारवाई करा. अहाे जे माझ्यावर टीका करताहेत त्यांचीच इथं हाॅटेल आहेत.

प्रत्येक वेळेस पैसा, पैसा, पैसा. काय करायचे काय पैशाचे, मला कळत नाही. यामधील मला काय पैसा मिळणार आहे. कमानीचा ठेका मला मिळाला असतं तर बंर झालं असतं असे उदयनराजेंनी नमूद केले. हे याेग्य नाही. यातून त्यांचा निष्क्रियापणा समाेर येत आहे असेही त्यांनी म्हटलं. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT