uday samant 
महाराष्ट्र

वहिनींवर ऍसिड फेकायला काेणी सांगितले? या टीकेवर सामंत म्हणाले...

अनंत पाताडे

सिंधूदूर्ग : रत्नागिरीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी काेणाचे ही नाव घेता टीकास्त्र साेडले. त्यांनी चुकुनही नादाला लागू नका तुम्हांला आमचा अनुभव आहे असे विराेधकांना (शिवसेना) इशारा दिला. दरम्यान राणेंनी narayan rane आपल्या भाषणात काेणाचे नाव न घेता वैयक्तिक टीका केली. त्या टीकेवर मंत्री उदय सामंत uday samant यांनी वैयक्तिक पातळीवर टीका हाेऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

सामंत म्हणाले जन आशीर्वाद यात्रा ही केंद्र सरकार कोकणाला काय देणार हे सांगून जनतेचे आशिर्वाद घ्यायला पाहिजेत. किती ही कोणी यात्रा काढली शिवसेनेला ललकारणाऱ्याचा प्रयत्न केला तरी सेनेवर त्याचा काही परिणाम होणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

वहिनींवर ऍसिड फेकायला काेणी सांगितले? असा प्रश्न मंत्री नारायण राणे यांनी काेणाचेही नाव न घेता आपल्या भाषणातून उपस्थित केला. यावर उदय सामंत म्हणाले अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही.

राणे यांनी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर ताेफ डागली. शिवसेनेला टीकेचे लक्ष केले आता यात्रेला विरोध करणार का? या प्रश्नावर सामंत म्हणाले अॅक्शनला रियाएॅक्शन ही होत असते. प्रक्षोभ होणार नाही याची काळजी अथवा त्यांच्याकडील एॅक्शन व्हावी. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आम्हांला दैवत आहेत. त्यांच्यावर टीका करू नये त्यांची बदनामी करू नये असा सल्ला मंत्री सांमत यांनी दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salt comparison: काळं मीठ आणि सैंधव मीठ यांच्यात काय फरक आहे?

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, पुण्यासह २० जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

मोदींचा व्हिडीओ मेसेज, सोनम वागंचुकांनी उपोषण सोडलं; पण जंतर-मंतरवरील आंदोलन सुरूच, मध्यरात्री नेमकं काय काय घडलं?

Today's Horoscope : 'विठूमाऊलीची' अथांग कृपा! आज ६ राशींचे नशीब उजळणार; होणार धनलाभ, तुमच्या भाग्यात आज काय?

SCROLL FOR NEXT