sanjay raut, uday samant, barsu refinery project saam tv
महाराष्ट्र

Uday Samant On Sanjay Raut : अक्कल काढल्याने उदय सामंत संतापले, संजय राऊत हे तर...

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देखील आगामी काळात सेना रत्नागिरीत तीव्र विराेध करेल असा इशारा दिला आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Uday Samant News : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन (barsu refinery project) महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) खासदार संजय राऊत (mp sanjay raut) आणि उद्याेगमंत्री उदय सामंत (uday samant) यांची एकमेकांवर शाब्दिक टाेलेबाजी सुरु आहे. खासदार राऊतांनी उद्याेगमंत्री सामंत यांची अक्कल काढल्याने सामंतांनी आज तीव्र शब्दांत राऊतांना फटकारलं आहे. (Maharashtra News)

बारसू प्रकल्पावरुन खासदार संजय राऊत यांनी उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना सामंत यांनी काेणताही सरकारी कागद नाचवून शहाणपणा शिकवू नये असे म्हटलं. त्यावर आज (गुरुवार) माध्यमांनी उदय सामंत यांना याविषयी छेडलं असता सामंत यांनी राऊत हे जगातले सगळ्यात माेठे विद्वान असल्याची बाेचरी टीका केली.

पुढे बाेलताना उदय सामंत म्हणाले देशातल्या विद्वानांचे संजय राऊत महामेरू आहेत म्हणून ते प्रत्येकाची अक्कल काढतात. जगाच्या पाठीवर आता एकही विद्वान शिल्लक राहिलेला नाही जो या खासदार महोदयांच्या स्पर्धेत असेल.

विरोधीपक्ष सूद्धा सुट्टीवर जात नाही तिथे आपले मुख्यमंत्री सुट्टीवर जातात या संजय राऊत यांच्या टीकेवर उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिल आहे. सकाळची साडेनऊची पत्रकार परिषद कोणालाही नवीन नाही असे सामंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले ज्यांनी बारसूत रिफायनरीसाठी पत्र दिल ते कशासाठी दिल याचं शहाणपण त्यांना पहीलं विचारून घ्यावं असा टोला यावेळी उदय सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT