Gadchiroli News saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News: आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले अन् अनर्थ घडला; गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू

नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन युवकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना नगराम नदी घाटावर आज रविवारला घडली.

साम टिव्ही ब्युरो

मनोज भांडेकर

Gadchiroli News: सिरोंचा तालुक्याला लागूनच असलेली गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोन युवकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना नगराम नदी घाटावर आज रविवारला घडली. सुमन राजू मंसेट्टी आणि हिमांशू मून अशी मृतकांची नावे आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू मून हा नागपूर येथून आपल्या काही मित्रांसह कार्यक्रमासाठी सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे गेला होता. दरम्यान, आज सकाळी तो आपल्या मित्रांसह सुमन मुंसेट्टी याला भेटण्यासाठी सिरोंचापासून ८ किमी अंतरावरील चिंतलपल्ली येथे गेला. येथून हिमांशू व सुमन तसेच कार्तिक पडाला, नलिन पडाला व रंजित पडाला हे पाच जण गोदावरी नदीवरील नगरम घाटाकडे आंघोळीचा बेत करून निघाले. (Gadchiroli Latest News)

येथे गेल्यानंतर आंघोळीसाठी सर्वजण नदीपात्रात उतरले. पावसामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सुमन मंसेट्टी व हिमांशू मून व अन्य एकजण खोल पाण्यात बुडू लागले. मात्र अन्य एक व इतर दोघे असे तिघेजण कसेबसे पाण्याबाहेर निघाले. मात्र पाण्याच्या प्रवाहाने हिमांशू व सुमन दूर वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे

इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीमध्ये दुर्दैवी घटना घडली. शनिवारी इंद्रायणी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. हे तरुण अद्याप सापडले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.

शक्तिमान कुमार (२० वर्षे) आणि सोनू कुमार बैठा (२० वर्षे) असे या दोन तरुणांचे नाव आहे. दोन्ही तरुणांचा नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT