Yavatmal Crime News in Marathi, Yavatmal latest marathi news Saam TV
महाराष्ट्र

Crime: जयभीम चौकात दोन गट भिडले; १ युवक मृत्यूमुखी, २ जखमी, १० जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचा तपास यवतमाळ शहर पोलिस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) येथील पाटीपुरातील जयभीम चौकात दोन गटात झालेल्या मारामारीत एकाचा खून तर दाेघे गंभीर जखमी (injured) झाले. वैभव नाईक अशी मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव असून ताे तुरुंगातून (jail) पॅरोलवर बाहेर आला हाेता. या घटनेत सुहास अनिल खैरकार (वय २६, राहणार अशोकनगर) तसेच नयन नरेश सौदागर (वय २२, राहणार विठ्ठलवाडी, यवतमाळ) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. (Yavatmal latest marathi news)

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी : यवतमाळच्या पाटीपुरा येथील जयभीम चौकात सात ते आठ जण दारु पित बसले हाेते. यावेळी दोघांत वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट आमने सामने आले. त्यातून शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर नऊ जणांच्या टोळक्याने तिघांवर हल्ला केला.

या हल्ल्यात वैभव नाईक मृत्यूमुखी पडला. तसेच सुहास खैरकार आणि नयन सौदागर दोघे गंभीर झाले. यवतमाळ शहर पोलिसांनी (yavatmal city police) या प्रकरणाचा तपास करुन पहाटेच्या सुमारास दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT