Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: चिमुकलीसाठी विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, नागपुरात सुरू होते उपचार, अखेर मृत्यूशी झुंज अपयशी

kingsway hospital nagpur: उपचार सुरु असताना आज अचानक चिमुकलीची प्रकृती गंभीर झाली आणि तिचा मृत्यू झाला.

Priya More

संजय डाफ, नागपूर

Nagpur Airport: विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग (Plane Emergency Landing) करुन नागपूरमध्ये उपचार सुरु असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला आहे. या चिमुकलीवर नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये (kingsway hospital) उपचार सुरु होते. पण अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. उपचार सुरु असताना आज अचानक चिमुकलीची प्रकृती गंभीर झाली आणि तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या चिमुकलीवर ८ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे कार्डीयाक सर्जरी झाली होती. त्यानंतर ती बंगळुरूवरुन दिल्लीला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अचानक या चिमुकलीची प्रकृती बिघडली. सुदैवाने या विमानातून ५ डॉक्टर प्रवास करत असल्यामुळे या चिमुकलीचा जीव वाचला होता.

चिमुकलीला सायनोटिक आजार होता. प्रवासादरम्यान विमानातच ती बेशुद्ध झाली होती. विमानातील डॉक्टर उपचार करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे या विमानाचे नागपूर एअपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. त्यानंतर तिला उपचारासाठी किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञांच्या १० जणांची टीम तिच्यावर उपचार करत होती. या चिमुकलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण अचानक या चिमुकलीची प्रकृती गंभीर झाली आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बरेच प्रयत्न करून देखील चिमुकलीचा मृत्यू झाला. चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुमंत्रालयातील कॅन्टीनला क्लीनशीट कशी? संजय गायकवाडांचा संताप

3 Gram Mangalsutra Designs: ऑफिस ते रोजसाठी परफेक्ट! ३ ग्रॅमचे लाईटवेट मंगळसूत्र पाहा ट्रेंडी ७ सुंदर डिझाइन्स

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT