अधिवेशनात हजेरी लावलेल्या 'या' दोन आमदारांना कोरोनाची लागण...(पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

अधिवेशनात हजेरी लावलेल्या 'या' दोन आमदारांना कोरोनाची लागण...(पहा व्हिडिओ)

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ : कोरोना व्हायरसचा (corona) प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या (corona patients) रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यातच राज्यामधील आमदार (MLA), मंत्री आणि नेते (ministers and leaders) मंडळींना देखील कोरोनाची लागण होत आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) हजेरी लावलेल्या २ आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

पहा व्हिडिओ-

आमदार निलय नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह (Positive) अहवाल आल्यानंतर आमदार निलय नाईक हे नागपूर येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार घेत आहे. तर पुसद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबई (Mumbai) येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये (hospital) उपचार घेत आहे.

दोन्ही आमदारांची (MLA) प्रकृती ठिक आहे. दोन्ही आमदारांनी कोरोनाची टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोविड (Covid) टेस्ट करून घ्यावी असे आवाहन आमदार निलय नाईक यांनी यावेळी केले आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरहून आषाढी वारी हुन परतणाऱ्या वारकऱ्यांसाठी उभारले अन्नछत्र

Garam masala: कोणत्या भाज्यांमध्ये गरम मसाला वापरू नये?

Ind vs Eng : एजबॅस्टनच्या विजयानंतर टीम इंडियात होणार बदल! शुभमन गिलने दिली मोठी माहिती, कुणाला मिळणार डच्चू?

Nandurbar : नंदुरबारच्या सातपुड्यात पर्यटकांची हुल्लडबाजी | VIDEO

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT