Maharashtra Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Heat Wave: सावधान! राज्यात उन्हाचा पारा वाढला; उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात उष्माघाताने घेतला दोघांचा बळी

Maharashtra Heat Wave: मराठवाड्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

डॉ. माधव सावरगावे

chhatrapati sambhaji maharajnagar News: मराठवाड्यातून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मराठवाड्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मराठवाड्यासहित राज्यातही उन्हाचा पारा वाढल्यानंतर नागरिकांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)

गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात उन्हाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला आहे. या उष्माघाताने संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आडूळ बुद्रुक आणि नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी हिंगोली कनेरगाव नाका येथील एका चार वर्षीय चिमुकलीचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला होता.

आता मराठवाड्यात (Marathwada) उष्माघाताच्या बळीची संख्या एकूण ३ वर गेली आहे. हिमायतनगर (जिल्हा नांदेड) येथील २८ वर्षीय विशाल रामराव मादसवार यांनी शुक्रवारी दिवसभर शेतात काम केले. घरी आल्यावर रात्री जेवणानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

संभाजीनगर जिल्ह्यातील आडूळ बुद्रुक येथे शनिवारी ३८ वर्षीय तातेराव ऊर्फ बंडू मदन वाघ यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तातेराव हे सुद्धा शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास शेतातून घरी येत असताना गावातील इस्लामपुरा भागातील अश्पाक किराणा दुकानासमोर भोवळ येऊन पडले. परिसरातील नागरिकांना आडूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये ७० वर्षीय वृद्धेचा उष्माघात सदृश्य आजाराने मृत्यू

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा उष्माघात सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भिमाबाई शिवराम हिरे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. मात्र, त्या शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सार्वजनिक शौचालयात गेल्या असता अचानक चक्कर आणि उलटी झाल्याने बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT