Parbhani News  Saam TV
महाराष्ट्र

Parbhani Ratngiri News : परभणीत पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीतही 2 शाळकरी मुले बुडाले

Two Drown in Parbhani : पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे.

राजेश काटकर

Parbhani News : धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना बुडून मृत्यू झाला आहे.  परभणीतील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या गेटजवळ ही घटना घडली आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे.

सेलू शहरातील गायत्रीनगर येथील रोहित दीपक टाक (वय 23)व नितीन गुणाजी साळवे (वय 25)असे मयत तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरुण सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास दुधना प्रकल्पाच्या गेटजवळ पोहण्यास उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज आल्याने ही दुखद घटना घडली आहे. (Breaking Marathi News)

दोघा तरुणांचे मृतदेह पाण्यात तरंगतांना मच्छामारांना दिसले. त्यानंतर त्यांनी लगेच परतुर पोलिसांना माहिती दिली. दोन्ही तरुणांचे मृतदेह मच्छीमारांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. (Latest Marathi News)

धरणाजवळ युवकांचे कपडे,मोबाईल,चप्पल असे साहित्य आढळून आले आहे. सेलू उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून सेलू पोलीस पुढील तपास करत आहे.

रत्नागिरीतही दोघेजण बुडाले

रत्नागिरी-चिपळूणमधील शिरगाव जवळच्या नदीवर पोहायला गेलेल्या दहा मुलांपैकी दोघेजण बुडाल्याची घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी नदीच्या डोहात आंघोळ करण्यासाठी गेले होते. बुडालेले दोघेही दहावीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. अतिक बेबल आणि अब्दुल लसने अशी बेपत्ता दोन मुलांची नावे आहे. शिरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मुलांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; क्रिप्टो गुंतवणुकीत गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

SCROLL FOR NEXT