Buldhana Accident Saaam Tv
महाराष्ट्र

भरधाव टिप्परने काका-पुतण्याला चिरडलं; दोघांचा मृत्यू, १ जण गंभीर

Buldhana Accident : जलंब ते माटरगाव महामार्गावर बुधवारी (४ मे) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला (track Bike Acident) धडक दिली. या धडकेत काका-पुतण्याचा जागीच मृत्यू असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला खामगाव (Khambgaon) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जलंब ते माटरगाव महामार्गावर (Jalamb To Matargaon) बुधवारी (४ मे) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

शाम भीमराव देशमुख आणि पार्थ गंभीरराव देखमुख अशी मृत्यूमुखी पडलेल्या काका पुतण्याची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भीमराव देशमुख हे आपला पुतण्या पार्थसह गावातील व्यक्ती कुणाल देशमुख यांच्यासह दुचाकीने बुधवारी रात्री गावाच्या दिशेने येत होते. दरम्यान, जलंब ते मारटगाव महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने देशमुख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, देशमुख हे टिप्परच्या चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर, पार्थ आणि कुणाल देशमुख या अपघातात गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खामगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचार सुरू असताना पार्थचीही प्राणज्योत मावळली. मृत काका पुतण्यांचे आज गुरूवारी शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जलंब पोलिसांत टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, काका पुतण्याचा अपघातात मृत्यू झाल्याने देशमुख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT