two passes away in a road accident near mohol saam tv
महाराष्ट्र

Mohol: खासगी बसच्या धडकेत जीपचा झाला चुराडा; दाेन ठार, जखमींवर उपचार सुरु

या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : पुणे महामार्गावरील (highway) मोहोळजवळ (mohol) आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास खासगी बस आणि जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य प्रवासी जखमी (injured) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (mohol accident latest marathi news)

घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खासगी बस ही पंढरपूरहून (pandharpur) मोहोळकडे जात होती. तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणारी जीप ही मोहोळहून पंढरपूरकडे जात होती. या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात खासगी जीपचा पूर्ण चूराडा झाला.

accident on pune highway near mohol

या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी (mohol police) घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून सुखरूपपणे पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. या अपघातात दाेघांचा मृत्यू झाला आहे तसेच जखमींवर उपचार सुरु असल्याचे पाेलीसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT