Pune GBS News : गेल्य काही दिवसांपासून राज्यात जीबीएस (Guillain-Barré Syndrom) आजाराने थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पुण्यात असल्याचे दिसतेय. पुण्यात जीबीएसमुळे आणखी दोन रूग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील एकूण मृताची संख्या ११ वर पोहचली आह. तर राज्यातील एकूण रूग्णांची संख्या २११ इतकी झाली आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नागपूरमध्ये जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या २११ वर पोहोचली आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. तो सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. त्याला १० जानेवारीला ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या हातांमध्ये अशक्तपणा होता. त्याला आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आली होती. त्याच्या तपासणीत जीबीएसचे निदान झाले होते.
प्रकृती बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याचा १७ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुुण्यातील खासगी रुग्णालयात २६ वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. तिला १५ जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर तिला गिळण्यास त्रास सुरू होऊन अशक्तपणा जाणवू लागला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिचा १८ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
जीबीएस’ची स्थिती.
एकूण रुग्णसंख्या - २११
रुग्णालयात दाखल - ५६
अतिदक्षता विभागात - ३६
व्हेंटिलेटरवर - १६
बरे झालेले रुग्ण - १४४
मृत्यू - ११
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.