Akola : पातुर च्या धामणदरी तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू! जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola : पातुर च्या धामणदरी तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू!

अकोल्यातील पातुरच्या धामणदरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा आज बुडून मृत्यू झाला.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील पातुरच्या धामणदरी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा आज बुडून मृत्यू झाला. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. पातुर विश्रामगृहाच्या मागे असलेल्या शेतशिवार क्र-२ या परिसरात धामणदरी तलाव आहे. या तलावात पोहण्यासाठी पाच अल्पवयीन मुले गेली होती. त्या पैकी दोन मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ती बुडाली.

हे देखील पहा :

मृत पावलेल्या मुलांची नावे, शेख दानिश अस्लम (वय १५ वर्षे), शेख समिर रईस अशी असून दोघेही साळणीपूरा पातूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह स्थानिक मच्छीमार देविदास श्रीनाथ यांच्या मदतीने तलावाबाहेर काढण्यात पातूर प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. वाचलेल्या तीन मुलांनी सदर घटनाक्रम प्रशासनासमोर कथन केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हरीश गवळी ताफ्यासह तथा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन सामग्री सह नायब तहसिलदार सय्यद ऐहसानोद्दिन, तलाठी पठाण, पोलीस विभागाचे भवाने तथा मेजर पवार घटना स्थळी होते. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT