Leopards Fight Viral Video तबरेज शेख
महाराष्ट्र

Viral: १०० फूट उंच झाडावर दोन बिबट्यांची तुफान झुंज; थरारक दृश्य पाहून सगळेच चक्रावले, पाहा Video

Leopards Fight On Coconut Tree: यावेळी एक बिबट्या चक्क १०० ते १५० फूट उंच असलेल्या एका नारळाच्या झाडावर चढला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख, नाशिक

नाशिक: बिबट्या म्हटलं की, अंगावर अक्षरशः काटा येतो. नाशिच्या सिन्नमधील एका शेतकऱ्याला असाच प्रत्यय आला आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात दोन बिबटे (Leopards) शिरले आणि तिथेच या दोन्ही बिबट्यांची आपापसात झुंज लागली. यावेळी एक बिबट्या चक्क १०० ते १५० फूट उंच असलेल्या एका नारळाच्या झाडावर चढला, तेव्हा त्याचा मागोवा घेत दुसराही बिबट्या त्या झाडावर चढला आणि दोघांत पुन्हा झुंज झाली. हा थरारक प्रकार एका शेतकऱ्यानं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Leopards Fight Viral Video)

पाहा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ (Viral Video) नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील आहे. सांगवी येथील सांगवी धनगरवाडी रोडवर असलेल्या दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घरा शेजारी व शांताराम विठोबा घुमरे वस्तीसमोर असलेल्या नारळाच्या झाडावरती या दोन बिबट्याची झुंज पाहायला मिळाली. आज, रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास या दोन बिबट्यांची झुंज होतांना शेतकऱ्याला दिसली तेव्हा त्याची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, झाडाचा आडोसा देत शेतकऱ्याने त्याचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले.

या ठिकाणी ऊस आणि मक्याचीची शेती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बिबटे झाडावरपन खाली उतरुन तिथेच लपून बसलेले आहेत. जवळपास शंभर ते दीडशे फूट नारळाच्या झाडावरुन बिबट्या खाली उतरुन येत असताना दुसरा बिबट्या पहिल्या बिबट्याच्या मागे लागतो. दोनी बिबटे झाडावरती जातानाचा व्हिडिओ दिसत आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिली असून तेथे पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धड भाषणही देता येत नाही, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रेसचा नाव न घेता पार्थ पवारांवर सणसणीत पलटवार

Maharashtra News Live Update: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टरबूज आणि भाजीपाल्याच्या दरात घसरण

Constipation Relief: सकाळी पोट साफ होत नाही? झोपण्यापूर्वी हा १ पदार्थ खा, समस्या दूर होईल

Sambhajinagar : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Nagpur: बेपत्ता नवरा लवकरच घरी येईल, पूजा करण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा विवाहितेवर बलात्कार; नागपूर हादरले

SCROLL FOR NEXT