यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; एकाची हत्या असल्याचा आरोप Saam TV
महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; एकाची हत्या असल्याचा आरोप

मृतक शेतकऱ्याकडे पाच एकर शेती असून महिंद्रा फायनान्स व बँक ऑफ इंडिया या बँकेचे कर्ज असल्याचा बोललं जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील आमणी येथील 43 वर्षीय शेतकरी मांगीलाल उकंडा चव्हाण या शेतकऱ्याने विष प्राशन करून घराशेजारीच असलेल्या भिंतीजवळील रस्त्यावर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची फिर्याद मृतकाचा पुतण्या नरेंद्र हजारी चव्हाण 36 वर्ष राहणार आसरा याने आर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. मृतक शेतकऱ्याकडे पाच एकर शेती असून महिंद्रा फायनान्स व बँक ऑफ इंडिया या बँकेचे कर्ज असल्याचा बोललं जात आहे. (Yavatmal News Todays)

तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी वरून एक किलोमीटरवर असलेल्या चोर उमरी मारुती मंदिराजवळ शेतकर्‍यांनी वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नरसिंग राठोड वय ४५ राहणार मांगुळ तालुका नेर असे मृतकाचे नाव आहे. नरसिंग राठोड हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्याच्याकडे तीन एकर शेती असून ते मिस्तरी काम करायचा. त्याची मागे दोन मुलं दोन मुली पत्नी असा परिवार आहे.

नरसिंग राठोड याचा खून करून झाडाला लटकविण्यात आले असा आरोप नरसिंग राठोडच्या नातेवाईकांनी केला आहे. पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर जुंघरे करीत आहे. या घटनेमुळे मांगुळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Hidden Fort In Pune : पुरंदर तालुक्यात लपलाय १६व्या शतकातील खजिना, 'या' किल्ल्यावर जाताच उलगडेल रोचक इतिहास

Dhurandhar : रहमान डकैत विरुद्ध हमजा अलीचा थरार घरबसल्या पाहा; रणवीर सिंहचा 'धुरंधर ' टीव्हीवर येतोय, कुठे अन् कधी पाहाल?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिलमध्ये वाढू शकतो महागाई भत्ता, नवीन अपडेट समोर

काय आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT