Vinod alias Balu Khandare saam tv
महाराष्ट्र

Satara : 'या' प्रकरणात माजी नगरसेवक बाळू खंदारेची पाेलिस काेठडीत रवानगी

सप्टेंबर 2001 कालावधीत खूनाचा प्रयत्न, आर्म Act नूसार खंदारेवर गुन्हा दाखल झाला हाेता.

Siddharth Latkar

Satara : खूनाच्या प्रयत्नाप्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर सातारा पालिकेचे माजी नगरसेवक विनोद उर्फ ​​बाळू खंदारे (balu khandare) सातारा पाेलिसांना साेमवारी शरण आला. शहर पोलिसांनी त्याला अटक (satara police arrests former corporator vindo khandare) करून जिल्हा न्यायालयात हजर केले असा न्यायालयाने खंदारे यास दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

दीड वर्षापूर्वी तालीम संघनजीक सनी भोसले याच्यावर पिस्तूल दाखवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी विनाेद उर्फ बाळू खंदारे याच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल हाेता. या प्रकरणात खंदारे याने अटकपुर्वसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती.

उच्च न्यायालयाने नुकताच बाळू खंदारे याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे खंदारे स्वत: पोलिसांना साेमवारी शरण आला. सातारा शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक भगवान निंबळाकर यांनी खंदारे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दाेन्ही बाजूच्या युक्तीवादानंर बाळू खंदारे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान माजी नगरसेवक बाळू खंदारे हा आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांच्या नगरसविकास आघाडीचा सदस्य आहे. तसेच फिर्यादी सनी भाेसले हा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) गटाचा आहे. त्यामुळे खंदारेच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली हाेती. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Pathology lab reports: रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर प्रत्यक्षात तपासणी करतात का? ‘घोस्ट पॅथॉलॉजिस्ट’ प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT