amravati, accident, youth, student, police, badnera saam tv
महाराष्ट्र

Accident : कार पाहताच काळजात झाले धस्स, युवकासह अल्पवयीन मुलगी ठार; मुलीच्या वडिलांचा अपहरणाचा आराेप

बडनेरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Nagpur Mumbai Highway : अमरावती शहरालगत असलेल्या नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात युवक व अल्पवयीन मुलगी मृत्यूमुखी पडले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. पाेलिस या अपघाताचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान या अपघातात (accident) मृत्यमुखी पडलेल्या मुलीच्या वडिलांनी युवकाच्या विराेधात मुलीच्या अपहरणाची तक्रार पाेलिसांत दिली आहे. (Breaking Marathi News)

या अपघातात आदित्य विश्वकर्मा (वय 19) याचा मृत्य झाला आहे. पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत त्यांनी संबंधित मृत्यमुखी पडलेल्या मुलीला त्यांनी शिवाजी विज्ञान महाविद्यालयात नेऊन सोडले व ते घरी परतले. त्यानंतर आदित्य विश्वकर्मा याने तिला तिच्या महाविद्यालयातून फुस लावून पळवून नेले. (amravati latest marathi news)

त्यानंतर नागपूर अमरावती महामार्गावर कोंडेश्वर जवळ त्यांचा अपघात (accident) झाला. हा अपघात आदित्यच्या निष्काळजीपणामुळे झाला असा आराेप देखील मुलीच्या वडिलांनी केला आहे. तसेच त्याने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक मारली. त्यामुळे माझ्या मुलीच्या मृत्यूला आदित्य कारणीभूत आहे असेही बडनेरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. बडनेरा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram Charan Bodyguard : सलमानच्या शेरानंतर राम चरणच्या बॉडीगार्डची चर्चा; उत्साही चाहत्याला एका झटक्यात बाजूला केलं, 'केविन कुंटा' आहे तरी कोण?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

SCROLL FOR NEXT