महाराष्ट्र

मेंढ्यांना धुवायला गेले अन् काळाने घातला घाला, दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

करंजी तालुक्यातील पाथर्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

तिसगाव : करंजी तालुक्यातील पाथर्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे. बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा (Two Brothers died) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने (Water Drowning) एकच खळबळ उडाली आहे. संदीप अकोलकर (२९) आणि बापू अकोलकर (२७) अशी मृतांची नावं आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आणि बापू हे दोघे सख्ख्ये भाऊ त्यांच्या शेतात असलेल्या तलावाजवळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांना तलावाजवळ गेले असता संदीपचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर संदीपला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ बापूने त्याला हात दिला. मात्र, दोघांचाही तोल गेल्याने ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने या दोघा भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

त्यानंतर ही घटना संदीपची पत्नी सोनालीनं पाहिली. सोनालीने आरडाओरडा केल्यानंतर नामदेव अकोलकर,दादा मुखेकर यांनी घटनास्थळी धाव घेत या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, दोघाही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT