धुळ्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना बेड्या भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना बेड्या

धुळ्यामध्ये पोलिसांनी अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळत तब्बल सोळा लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये असलेल्या पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दारूची अवैधपणे वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी सापळा रचला असता पिंपळनेर सटाणा या रस्त्यावर दोन चार चाकी वाहने पोलिसांना संशयितरित्या आढळून आली.

हे देखील पहा -

या दोन्ही वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांची दारु आढळून आली आहे. पोलिसांनी तात्काळ हा सर्व मद्यसाठा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले असून या कारवाई दरम्यान तब्बल 16 लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या दोघांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा साठा कुठून आणला होता व कुठे नेला जात होता याची पिंपळनेर पोलीस चौकशी करत आहेत. यामध्ये आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT