आखाडी साजरी करण्यासाठी चोरट्यांनी पळवल्या चक्क वीस कोंबड्या Saam Tv
महाराष्ट्र

आखाडी साजरी करण्यासाठी चोरट्यांनी पळवल्या चक्क वीस कोंबड्या

आखाडी साजरी करण्यासाठीच काही चोरट्यांनी कोंबड्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

आखाड महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहर करण्याची प्रथा आहे. त्यासाठी सरसकट कोंबड्यांना या महिन्यामध्ये मागणी असते. अशातच आखाडी साजरी करण्यासाठी काही चोरट्यांनी कोंबड्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर मधील हिंगणेमळा येथील हाजी चिकन शॉप जवळील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून वीस कोंबड्या चोरीला गेल्याचा प्रकार घडकीस आला आहे. आखडीसाठी चक्क कोंबड्या चोरल्याने हडपसर परिसरातील चिकनशॉप वाल्यांची मात्र झोप उडाली आहे.Twenty chickens were stolen by thieves to celebrate the akhadi

हे देखील पाहा-

शॉप मालक अस्लम इस्माईल शेख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारpolice Station Complaint दाखल केली आहे. तसेच रविवार असल्याने गावरान कोंबड्या विकण्यासाठी दुकाण मालकाने नविन कोंबड्या पिंजऱ्यात आणून ठेवल्या होत्या. दरम्यान मालक सकाळी दुकान उघडायला आल्यावरती शेजारील पिंजऱ्यात पाहिले असता पिंजऱ्याचे कुलूप तोडून आत मधून कोंबड्या चोरल्याचे मालकाच्या निदर्शनास आले. रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते. मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं मालकाला मोठं नुकसानLoss सहन करावा लागलं आहे.

कोंबड्या चोरीला गेल्यामुळे मालकाला ऐन धंद्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर नुकसान मालकाला आर्थिक नुकसान मोठं प्रमाणात झाले आहे. दुकानाशेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता तीन अज्ञात लोकांनी गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये 20 कोंबड्या भरून हडपसरच्याHadapsar दिशेने गेल्याचे घटना सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे. या रेकॉर्डवरुन हडपसर विभागाचे पोलिस त्या चोरट्यांचा तपास घेत आहेत.

दरम्यान हडपसर पोलीस ठाण्यात पाचशे रुपयाच्या 20 कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. आमची गरिबी परिस्थिती तरी कोंबड्याचा लवकरात लवकर शोध घेऊन मला बरपाई द्यावी, अशी विनंती मालक अस्लम शेख यांनी तक्रारी अर्जातून केली आहे. या घटनेसंदर्भात हडपसर पोलीस कोंबड्या चोरणाऱ्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT