Tuljapur saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Ramvardayini : आई राजा उदोऽऽ उदोऽऽ तुळजापूर सजलं; कुंकवाची उधळणीत जलयात्रेस प्रारंभ

तुळजाभवानी देवीची राम वरदायिनी म्हणून ओळख आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljpaur News :

पारंपारिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो उदोऽऽ अशा जय घोषात कुंकवाची उधळण करीत आज तुळजापूर येथे जलयात्रा मिरवणुक काढण्यात आला. या यात्रेत हजारो सुहासिनी महिला सहभागी झाल्या हाेत्या. महिलांनी जल आई तुळजाभवानीच्या (tuljabhavani) चरणी अर्पण केले. याच जलाने देवीचा गाभारा स्वच्छ करण्यात आला. (Maharashtra News)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील (Shakambhari Navratri) पाचव्या माळेदिनी नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला जलयात्रेचा पारंपारिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जलयात्रेत सजविण्यात आलेल्या खास वाहनात शाकंभरी देवीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. या प्रतिमेस सर्वप्रकारची हिरव्या फळे पालेभाज्या यांचा हार तयार करुन घालण्यात आला होता. पारंपारिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो उदोऽऽ च्या जय घोषात कुंकवाची उधळण करीत या जलयाञा मिरवणुकीस प्रारंभ झाला.

दरम्यान तुळजाभवानी देवीच्या मंदीराला आकर्षक देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सव व अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापने निमीत्त मंदीरात व परीसरात ही सजावट करण्यात आलीय.

आयोध्येत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना (ayodhya ram temple pran pratishtha) होत असताना तुळजाभवानीच्या तुळजापूरात देखील गेल्या तीन दिवसांपासून राम प्रतिष्ठापनेसाठी महायज्ञ केला जात आहे.

अयोधेच्या धर्तीवरच तुळजापुरताही पूजा मांडली असुन या पुजेत आई तुळजाभवानी व रामाचे नाते सांगणारा राम वरदायिनी जप केला जात असुन दुपारी 12 वाजता रामाच्या मंदीरात राम मुर्तीची प्रतिस्थापना केली जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीच्या मानवत येथे डिझेल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी

Face Care: चेहऱ्यावर खूप पिंपल्स आलेत? मग आठवड्यातून २ वेळा 'या' पानांची पेस्ट करुन चेहऱ्याला नक्की लावा

Crime: महाराष्ट्र हादरला! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं

राज्यात पावसाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची उभी पिके आडवी, कोण-कोणत्या जिल्ह्याला झोडपलं?

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

SCROLL FOR NEXT