Tuljabhawani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhawani Mandir : तुळजाभवानी मंदीर संस्थानला २३ कोटी ५२ लाखांहून अधिकचे उत्पन्न; मंदीरातील उत्पन्नाच्या बाबींचा लिलाव

Dharashiv Tuljapur : तुळजाभवानी मंदीरातील वाहीक वस्ञ, होम शाळा, गणेश मंदिर, चिंतामणी यमाई, नंदादीप तेल, शिधा साहित्य, आधारवाडी येथील मंदिर संस्थानचे दोन्ही वाहनतळ आदी सात बाबींची लिलाव प्रक्रिया पार पडली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
तुळजापूर (धाराशिव)
: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदीर संस्थानला दान स्वरूपात आलेल्या वस्तू तसेच रोख रकमेच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असते. तर आता संस्थानला आलेल्या विविध उत्पन्नाच्या बाबींच्या लिलावातून २३ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहेत. कारण सदरची लिलाव प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. 

तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर भाविकांची रीघ लागलेली असते. दर्शनासाठी आलेले भाविक दानपेटीत रोख रक्कम टाकत असतात. तर काही भाविक हे दागिने किंवा वस्तू स्वरूपात दान करत असतात. यातून मोठ्या प्रमाणात संस्थानला उत्पन्न मिळत असते. तर मंदीरातील विविध उत्पन्नाच्या बाबींचा तीन वर्षासाठी लिलाव करण्यात येत असून यातून देखील उत्पन्न मिळत असते.  

सात बाबींचा तीन वर्षांसाठी लिलाव 

तुळजाभवानी मंदीरातील वाहीक वस्ञ, होम शाळा, गणेश मंदिर, चिंतामणी यमाई, नंदादीप तेल, शिधा साहित्य, आधारवाडी येथील मंदिर संस्थानचे दोन्ही वाहनतळ आदी विविध सात बाबींची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. मागील काही वर्षांपासून मंदिर संस्थान तीन वर्षासाठी लिलाव करत आहे. त्यानुसार यंदा हा लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली असून ती पुढील तीन वर्षांसाठी आहे. 

लिलावात ५२ टक्क्यांनी वाढ 

लिलाव प्रक्रियेत मंदिर संस्थांना यापूर्वीच्या लिलावाच्या तुलनेत ८ कोटी २६ लाख ११ हजार रुपये अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थांच्या उत्पन्नात २३ कोटी ५२ लाख ४४ हजार रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यंदा लिलावात ५२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असुन ८ कोटी २६ लाख ११ हजार रुपयांचे अधिकचे उत्पन्न मिळणार आहे; अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT