Tuljapur TuljaBhavani Temple News Saamtv
महाराष्ट्र

Tuljapur News: आई तुळजा भवानीचे दागिने वितळवण्यास परवानगी; २०४ किलो सोने अन् ३ टन चांदीचा समावेश

Tuljapur TuljaBhavani Temple News: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापुरच्या आई भवानीच्या दागिन्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Gangappa Pujari

Tuljabhavani Temple News:

अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजापुरच्या आई भवानीच्या दागिन्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आई तुळजा भवानीच्या चरणी दान केलेले दागिने वितळवणार असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे. याबाबत विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजा भवानीच्या (Aai TuljaBhavani) दर्शनाला राज्यासह परराज्यातूनही अनेक लोक येत असतात. आई तुळजा भवानीच्या चरणी भाविक भक्त दाग दागिने अर्पण करत असतात. हेच भाविकांनी दिलेले सोने तसेच चांदीचे दागिने आता विळवण्यात येणार आहेत.

यामध्ये 2009 ते जून 2023 या कालावधीमध्ये देवीच्या चरणी अर्पण केलेले दागिने वितळे जाणार आहेत. याबाबत देवस्थान ट्रस्टने राज्य सरकारकडे रितसर परवानगी मागितली होती. देवस्थानची ही मागणी राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने मंजुर केली आहे.

यामध्ये एकूण 204 किलो सोने तर 3000 किलो चांदीचा समावेश आहे. दरम्यान, साईबाबा संस्थान व सिद्धिविनायक गणपती ट्रस्टच्या वतीने हे भक्तांनी अर्पण केलेले मौल्यवान दागिने वितळवले जातात. त्यानंतर ते रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवी म्हणून ठेवले जातात. त्याचप्रमाणे ही प्रक्रिया होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT