tuljabhavani gold and sliver ornaments to be melt soon  saam tv
महाराष्ट्र

Tuljapur : तुळजाभवानीचे 207 किलो सोने, 2570 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय; शिर्डी व सिध्दिविनायक मंदीर प्रमाणे प्रक्रिया

Tuljabhavani Mandir Latest Marathi News : या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधिशासह,धर्मादाय,पुरातत्त्व विभाग,महंत, पुजारी मंडळ आदींचा समावेश आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv :

उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर तुळजाभवानी मातेला भाविकांनी अर्पण केलेले 206 किलो 723 ग्रॅम सोने व 2570 किलो चांदी वितळवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी धाराशिवचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 28 जणांची समितीची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. (Maharashtra News)

या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधिशासह,धर्मादाय,पुरातत्त्व विभाग,महंत, पुजारी मंडळ आदींचा समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आदेश काढला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 26 मार्च 2024 रोजी सोने चांदी सदृश वस्तु वितळवण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान या संदर्भात मंदीर संस्थांनी मंदीर समितीच्या 4 जुलै 2023 च्या विश्वस्त सभेत घेतलेल्या ठरावानुसार शिर्डी व सिध्दिविनायक मंदीर प्रमाणेच सोने वितळवण्याची कार्यपध्दती अवलंब करत तुळजाभवानीच्या सोन्या चांदीच्या वितळवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

SCROLL FOR NEXT