Truck tractor accident on Pune-Bangalore highway two persons died on the spot Saam TV
महाराष्ट्र

Satara News: पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

ओंकार कदम

Satara Accident News

सातारा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ट्रक आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या महिलेसह एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील एक जण जखमी झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाही. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त (Accident) ट्रक भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने येत होता. या ट्रकने रात्रीच्या सुमारास लिंबेगावजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ट्रॅक्टरवर बसलेली महिला आणि पुरुष खाली पडले.

काही कळण्याचा आतच त्यांच्या अंगावरून ट्रॉलीचे टायर गेले. या घटनेत पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अपघातात ट्रकमधील एकजण देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited by - Satish Daud-Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT