Nagpur Accident News Update Nagpur Accident News Update
महाराष्ट्र

Nagpur Accident : काँग्रेसचे नितीन राऊत थोडक्यात बचावले, अज्ञात ट्रकने दिली वाहनाला धडक

Nagpur Accident News Update : काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या वाहनाला एका ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे अपघात झाला.

Namdeo Kumbhar

Nitin Raut Car Accident : नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि नागपूर उत्तरचे उमेदवार नितीन राऊत थोडक्यात बचावले आहेत. नितीन राऊत यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. या अपघातामध्ये नितीन राऊत थोडक्यात बचवाले. त्यांना कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नाही. याप्रकऱणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौकात बुधवारी रात्री उशीरा एका ट्रकनं नितीन राऊत यांच्या गाडीला धडक मारली. या अपघातात नितीन राऊत थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता, या अपघातात राऊत यांच्या वाहनाचे थोडे नुकसान झालेय. अपघातात राऊत सुखरूप असून कपिल नगर पोलिसांनी यासंदर्भात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT