Beed Accident Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident: ट्रक- क्रूझर जीपचा भीषण अपघात; 7 प्रवासी जागीच ठार

अंबाजोगाई - लातूर महामार्गवरील सायगाव परिसरातील घटना; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

विनोद जिरे

बीड - भरधाव वेगात असलेल्या ट्रक व क्रूझर जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात, 7 प्रवासी जागीच ठार झाले आहेत. हा अपघात बीडच्या (Beed) अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील अंबाजोगाई - लातूर (Latur) महामार्गावरील सायगावच्या जवळ काही वेळापूर्वी झालाय. तर या अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे देखील पाहा-

लातूर जिल्ह्यातील आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने जात होते. यावेळी सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यात 5 महिलांसह एक मुलगा व अन्य एक जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT