नागपूर-मुंबई महामार्गावर ट्रकने ऑटोला उडविले; ऑटो चालक जागीच ठार, 5 जखमी  Saam TV
महाराष्ट्र

नागपूर-मुंबई महामार्गावर ट्रकने ऑटोला उडविले; ऑटो चालक जागीच ठार, 5 जखमी

आज दुपारी ट्रक आणि ऑटो मध्ये घडलेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर (Nagpur-Mumbai National Highway) आज दुपारी ट्रक आणि ऑटो मध्ये घडलेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातातील जखमींना खामगावच्या (Khamgaon) उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

नागपूर-मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा कडून खामगावकडे येणाऱ्या प्रवासी आटोला नांदुराकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली या अपघातामध्ये ऑटो चालक प्रशांत अरुण साळुंखे वय 28 राहणार शिवाजीनगर खामगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींना खामगाव च्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT