Bhandara Road Accident अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: खड्डा चुकवण्याच्या नादात पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक; सुदैवाने जीवितहानी नाही

Bhandara Road Accident: अपघातात बोलेरो वाहनाच्या दर्शनी भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला असून येथे बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: कोळसा भरलेला भरधाव ट्रक आणि जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या बोलेरो पिकअप या चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक (Accident) झाली आहे. ही घटना भंडारा-तुमसर (Bhandara) राज्यमार्गावरील खापा येथे घडली आहे. या अपघातात मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अपघातात बोलेरो वाहनाच्या दर्शनी भागाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला असून येथे बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Bhandara Road Accident)

हे देखील पाहा -

या अपघातात कोळसा भरलेला भरधाव ट्रक चक्क महामार्गालगत असलेल्या धानपिकाच्या शेतात शिरला असल्याने येथे दोन्ही मालवाहू वाहनाचे चालक काही वाहनाचे प्रमाणात जखमी झाले आहेत. वाहनचालकांनी मार्गावरील खड्डे वाचविण्याच्या नादात आणि राज्यमार्गालगत असलेल्या राईस मिलमधील ट्रकच्या रांगा सदर अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. वाहनांच्या दोन्ही जखमा चालकांना तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनास्थळी तुमसर पोलीस दाखल होत त्यांनी घटनस्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT