Student Shares Shocking Hostel Experience During Rahul Gandhi’s Pune Event 
महाराष्ट्र

हॉस्टेलवाले प्रेगन्सी टेस्ट करायला लावतात; आदिवासी मुलीने सांगितली हॉस्टेलमधील धक्कादायक बाब

Tribal Hostel Controversy: ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने हॉस्टेलमधील कथित नियमांबाबत गंभीर माहिती राहुल गांधींसमोर मांडली. सुट्टीवरून परतल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र घेताना प्रेग्नन्सी टेस्ट केली जात असल्याचा तिचा दावा आहे.

Bharat Jadhav

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या मांजरीत उपोषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधींना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यासह आदिवासी हॉस्टेलमधील कडू सत्य जगासमोर मांडलं.

आदिवासी विभागाच्या पुण्यातील हॉस्टेलमध्ये गडचिरोली, नांदेड, अमरावती येथून विद्यार्थी येतात. ते दररोज घरी जाऊ शकत नाहीत. जर आम्ही दिवाळी किंवा इतर वेळी सुट्टीसाठी घरी जातात. मात्र जेव्हा परत आम्ही हॉस्टेलमध्ये परत येतो तेव्हा आमच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र मागितलं जातं. यात आमची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, अशी धक्कादायक माहिती एका विद्यार्थिनीने दिलीय.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा का होतेय?

आदिवासी मुलींचे होस्टेल आहेत ते मुख्य शहरात नसून शहराच्या बाहेर आहेत. त्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी मोठा प्रवास करावा लागतो. मी आता जे निवेदन दिले आहे, त्याचा विचार करून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती विद्यार्थिनीने केलीय. आमच्या भागात ज्या आश्रमशाळा असतात, तिथे सेंट्रल किचन पद्धत सुरू आहे. म्हणजे एका ठिकाणी जेवण बनवलं जाणार आणि ते 70-80 किमी लांब नेले जातं. त्यामुळे ते जेवण खराब होऊन विषबाधा होते.

आदिवाशी मंत्र्यांना विद्यार्थिनींना इशारा

पुण्यातील कार्यक्रमात खासदार राहुल गांधींशी संवाद साधताना आदिवासी विद्यार्थिनीने आश्रमशाळेतील वसतीगृहामधील समस्यांचा पाढा वाचला. त्याचबरोबर तिने आदिवासी कल्याण विभागाच्या मंत्र्यांना इशारा दिलाय. आदिवासी मुलं आपल्या मागंण्यासाठी मांजरीमध्ये आंदोलन करत आहेत.आम्ही आमच्या मागण्या आदिवासी विभागातील मंत्र्यांपुढे मांडल्या. माक्ष त्यावर त्यांनी सॉरी म्हणून उत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नोकरीचं स्वप्न दाखवलं, लॉजमध्ये डांबलं! शिरूरमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

गरीब ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! शिक्षण ते नोकरीपर्यंत मिळणार 50 कोटींची मदत

अभिजीत दिपके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल; मोठी खळबळ

हिंसा, अनादर, नियंत्रण बंधनं...; राहुल गांधींनी मांडली महिलांच्या परिस्थितीचं भयानक वास्तव दाखवणारी आकडेवारी

महिलांना तीन पद्धतीनं अडकवलं जातंय; मनुस्मृतीवरून राहुल गांधींचा घणाघात

SCROLL FOR NEXT