Nagpur Metro Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Metro Ticket Price: नागपूर मेट्रोत ५ रुपयांत करता येणार प्रवास; चेक करा तिकीटांचे दर

यामध्ये प्रवाशांना कमीत कमी ५ रुपये आणि जास्तीत जास्त ३५ रुपये तिकीटासाठी खर्च करावे लागतील.

Ruchika Jadhav

Nagpur Metro News: नागपूर मेट्रोच्या नवीन मार्गावरील तिकीटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नवीन मार्गावर प्रवाशांना जास्तीत जास्त ३५ रुपये तिकीटासाठी खर्च करावे लागणार आहेत. जुन्या मेट्रो मार्गावर कोवीडच्या काळात कमी केलेले दर आता पूर्ववत करण्यात आले आहेत. (Latest Nagpur Metro News)

यामध्ये प्रवाशांना कमीत कमी ५ रुपये आणि जास्तीत जास्त ३५ रुपये तिकीटासाठी खर्च करावे लागतील. कस्तुरचंद पार्क ते ॲाटोमेटीव्ह चौक, बर्डी ते प्रजापती नगर येथे तिकीटाचा दर ३५ रुपये आहे.

० ते २ किलो मिटरपर्यंतच्या प्रवासासाठी ५ रुपये, २ ते ९ किलो मिटरसाठी १० रुपये. ९ ते १२ किलो मिटरसाठी १५ रुपये तर १२ ते १५ साठी २० रुपये आणि १५ किलो मिटरपेक्षा जास्तीच्या प्रवासासाठी ३५ रुपये लागणार आहेत.

फूट ओव्हर ब्रिजसाठी अजूनही प्रतीक्षा

नागपूरमध्ये आता नवीन मार्गावरील मेट्रोसाठी तिकीटाचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र रेल्वे स्थानकातून मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांनी जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी फूट ओव्हर ब्रिजचे काम करण्यात येणार आहे. मात्र अजूनही यासाठी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सध्या रेल्वे भूविकास प्राधिकरणामार्फत नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. त्यामुळे फूट ओव्हर ब्रिजसाठी काही दिवसांआधी सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर रेल्वे स्थानकातल्या पुनर्विकासाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नागपूरकरांना स्वस्त मेट्रो प्रवास मिळत असला तरी फूट ओव्हर ब्रिजसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? अभिनेत्रीच्या टीमने केला मोठा खुलासा

Mirror Cleaning Tips : आरशावरचे डाग हटवा चुटकीसरशी; ‘ही’ सोपी ट्रिक करा ट्राय, आरसा दिसेल अगदी लख्ख

मुलाचा I Phone चा हट्ट, नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल, अख्खं कुटुंब संपलं

Maharashtra News Live Update: शाळेच्या मैदानात भरधाव कारने 12 वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले

Fitness Tips : जिमसारखी बॉडी हवी? मग दिवसाला किती अंडी खावी, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT