Pratap Sarnaik on Rahul Gandhi tribute tweet SaamTV
महाराष्ट्र

राहुल गांधींना फक्त नेहरू अन् काँग्रेस माहिती, शिवरायांबाबत त्यांनी बोलू नये; मंत्री प्रताप सरनाईक भडकले

Pratap Sarnaik on Rahul Gandhi Tweet : राहुल गांधीच्या या पोस्टनंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील राहुल गांधी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मात्र शिवजयंतीनिमित्त ट्विट करताना राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिल्याचा दावा भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

राहुल गांधीच्या या पोस्टनंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं आहे. त्याचदरम्यान, शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील राहुल गांधी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं. गांधी परिवाराने केवळ नेहरू, गांधी आणि काँग्रेस विषयी बोलावं. देशातील आराध्य दैवतांबाबत त्यांनी काही बोलू नये त्यांना काही माहिती नाही. राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी छत्रपती शिवरायांनी काय केलं आहे, हे राहुल गांधींना माहिती नाही, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विट करताना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे. हा महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातील लोकांचा अपमान आहे. जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात, पण राहुल गांधी हे नेहमी देशातील आणि महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत-नकळत अनादर व्यक्त करत असतात, त्यातील हा प्रकार आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. राहुल गांधी यांनी ट्विट मागे घ्यावं, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT