पोलिस 
महाराष्ट्र

नगरमध्ये ३०० पोलिसदादांच्या बदल्या

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर ः जिल्हा पोलिस दलातील तीनशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशसानाने शनिवारी सायंकाळी हे बदलीचे आदेश दिले. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये ११३जणांच्या बदल्या या प्रशासकीय स्वरूपाच्या आहेत. १८७जणांच्या बदल्या या विनंती स्वरूपाच्या आहेत.

बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस शिपायांपासून ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर बदल्यांचे आदेश काढले. शनिवारी काढलेल्या आदेशात ३४४ विनंती अर्जावर निर्णय घेतला आहे. त्यातील १५७ अर्ज नामंजूर करण्यात आले.

१८७जणांची विनंती मान्य करण्यात आली. प्रशासकीय बदल्यांचे १७४ अर्ज आहेत. ३९जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे.११३ कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्यांचे आदेश निघाले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सीसीटीएनएस विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे स्वतंत्र आदेश काढले जाणार आहे. दोन्ही विभागातील एकूण २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

साकत शिवारात दरोडा

जिल्हा पोलिसांना दरोडेखोरांनी पुन्हा आव्हान दिले आहे. त्यांनी नगर-सोलापूर रस्त्यावरील एक पेट्रोल पंप लुटला. साकत शिवारात केतन भारत पेट्रोल पंपावरील दोन लाख ५५ हजार रूपये दरोडेखोरांनी लंपास केले.अक्षय गोल्हार यांनी याबाबत तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT