रेल्वेचे इंजिन घसरल्याने कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द ! अनिल पाटील
महाराष्ट्र

रेल्वेचे इंजिन घसरल्याने कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द !

गोव्यातल्या दूधसागर सोनावळी दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेचे इंजिन घसरले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या 6 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अनिल पाटील

अनिल पाटील

गोवा : गोव्याजवळ Goa कर्नाटक Karnatak हद्दीत सोनावळी येथे दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने आज सकाळी मुंबईला जाणाऱ्या मंगळुरू - मुंबई स्पेशल ट्रेनचे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरल्याने आधीच पावसामुळे विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी ठप्प झाले. या घटनेनंतर कोंकण रेल्वे मार्गावरील 5 तर दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील 1 अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या.

आज सकाळी 6.20 च्या दरम्यान ही घटना घडली असे रेल्वेच्या सूत्रांकडून माहिती मिळाली. घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने ही दरड कोसळून माती रुळावर आल्याने हा अपघात घडला.

हे देखील पहा-

या अपघातात कुणालाही इजा झालेली नाही. ही गाडी नंतर कुळे रेल्वे स्थानकावर आणून ठेवली व गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बसमधून मडगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले.

रत्नागिरीत वाशिष्ठी नदीला पूर येऊन रेलमार्ग पाण्याखाली गेल्याने कोंकण रेल्वे मार्गावरील गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. त्यापैकीच एका गाडीला हा अपघात घडला.

हा पर्यायी मार्गही या अपघातामुळे बंद झाल्याने कोंकण रेल्वे मार्गरवरील मडगाव- मुंबई जनशताब्दी, एर्नाकुलम - निझमुद्दीन स्पेशल, निझमुद्दीन - एर्नाकुलम स्पेशल, मडगाव - एलटीटी स्पेशल व मंगळुरू - सीएसटी स्पेशल या पाच तर दक्षिण मध्य मार्गावरील वास्को- हावडा अशा 6 गाड्या रद्द करण्यात आल्या तर कोचुवेली - इंदूर साप्ताहिक रेल्वे राणींगुंटा- विजयवाडा- भोपाळ या मार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT