The residential building in NayaGaon, Vasai where the 4-year-old girl tragically fell from the 12th floor due to the lack of balcony grill Saam Tv
महाराष्ट्र

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Shocking CCTV Footage: वसईतल्या नायगावमध्ये घ़डलेल्या एक घटनेनं पालकांची चिंता वाढलीय. 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं? पालकांनी सजग का राहायला हवं?

Omkar Sonawane

हा व्हिडिओ तुमच्या काळजाचा थरकाप उडवू शकतो... बहिणीकडे गेलेली महिला आपल्या लहान मुलीसह घरी जाण्यासाठी बाहेर पडले. चिमुरडी इकडे तिकडे धावत होती. आईनं प्रेमानं धपाटा दिला आणि तिला चप्पल स्टॅण्डवर बसवलं. चिमुकलीची चप्पल घेण्यासाठी ती खाली वाकली आणि दोन सेकंदासाठी पाठ फिरताच..

नियतीनं खेळ केला. चिमुकली झटकन उभी राहिली आणि खिडकीवर बसायला गेली, मात्र त्याचवेळी तिचा तोल गेला आणि आईच्या डोळ्यादेखत चिमुकली खाली कोसळली. यावेळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने इमारतील रहिवासी हादरुन गेले होते. वसईजवळील नायगावमधल्या एका इमारतीत काळजाचा ठोका चुकवणारा हा धक्कादायक प्रकार घडलाय.चिमुकलीला जवळच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

याआधीही पुण्यात एका इमारतीत आई घराबाहेर गेली असताना

4 वर्षीय चिमुकली खिडकीबाहेर लोखंडी जाळीला लटकल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. जवळच असलेल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यानं तत्परतेने धाव घेत तिचा जीव वाचवला होता.चिमुरड्यांसोबतच्या या वाढत्या घटना पाहता पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. अन्यथा पालकांची एक चूक किंवा थोडासा निष्काळजीपणाही चिमुरड्यांच्या जीवावर बेतू शकते...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

SCROLL FOR NEXT