जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा अपघाती मृत्यू.
आतापर्यंत चार शिक्षकांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट.
कान्हे फाट्यावर भरधाव डंपरने मोपेडला धडक दिली.
दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
मावळ तालुक्यात जनगणनेच्या कामासाठी जात असताना एका शिक्षिकेचा अपघातात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जनगणना करणाऱ्या चा शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसापूर्वी जनगणना सर्व्हे करणाऱ्या तीन शिक्षकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात असल्याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दीपाली तांबे असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल शिक्षकांकडून केला जात असून महामार्गावर भरधाव डंपर वाहतुकीवर तातडीने निर्बंध आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
दरम्यान कोल्हापुरातील दोन आणि लातूर येथील शिक्षकाचा मृत्यू जनगणना करताना झाला होता. कर्तव्य बजावत असताना शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना सरकारनं आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जातेय. भगवान पाटील आणि सांगोला येथील राजाराम ढोले या शिक्षकाचा हृदयविकाराने, तर लातूर मधील सुंदरम वांगसकर यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर आला आहे. जनगणना करणाऱ्या शिक्षकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास १० लाख सानुग्रह अनुदान द्यावे तसेच कुटुंबियांना अनुकंपा खाली नोकरी द्यावी,अशी मागणी कोल्हापुरातील खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने केली आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यात जनगणनेच्या कामाला अनुपस्थित राहिलेल्या ९ शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी खेड पोलीस ठाण्याला पत्र दिलय जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामाला प्राधान्य न देणाऱ्या शिक्षकांमध्ये पती-पत्नीचाही समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय.
पुण्याच्या खेड तालुक्यात जनगणना प्रक्रियेसाठी दांडी मारणाऱ्या ९ शिक्षकांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतलीय खेडचे तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी संबंधित शिक्षकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी खेड पोलीस ठाण्याला पत्र दिलय जनगणनेसारख्या महत्त्वाच्या शासकीय कामाला प्राधान्य न दिल्याचा ठपका संबंधित शिक्षकांवर ठेवण्यात आला असुन खेड तालुक्यात जनगणनेला दांडी; पती-पत्नींसह ९ शिक्षकांवर कारवाई होणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.