diliprao deshmukh 
महाराष्ट्र

निवडणुकीपुर्वी भाजपला धक्का; जिल्हा बॅंकेत काँग्रेसचे वर्चस्व

दीपक क्षीरसागर

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा माजी मंत्री काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख diliprao deshmukh गटाचे वर्चस्व राहणार आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागा या बिनविरोध झाल्यात. अर्ज छाननीच्या दिवशी १९ संचालक मंडळांपैकी १८ जागांवरील अर्ज वैध ठरले आहेत. तर विरोधकांचा एकही अर्ज वैध ठरलेला नाही. त्यामुळे १८ जागांवर निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता १९ पैकी पाच जागांवर एकाच उमेदवाराचा अर्ज असल्याने पाच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. latur district cooperative bank election latest news

यामध्ये लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज विलासराव देशमुख, अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासह अन्य तिघांचा समावेश आहे. पतसंस्था मतदारसंघातून वसंतराव सोनकांबळे यांचा एकमेव देशमुख विरोध गटाच्या उमेदवाराचा अर्ज वैध ठरला आहे.

दरम्यान विद्यमान संचालक मंडळाच्या विराेधी गटाचे अर्ज अवैध ठरल्याने भारतीय जनता पक्ष आणि आमदार रमेश कराड यांनी लातूर जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी आखलेली रणनिती फाेल ठरली आहे. यामुळे पुन्हा एकदा लातूर जिल्हा बॅंकेवर दिलीपराव देशमुख गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT