car accident at mumbai goa highway saam tv
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात : दोन कार समोरासमोर धडकल्या; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे, कारण...

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अपघातांमुळं मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa highway) मृत्यूचा सापळा बनला आहे. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. महाड तालुक्यातील टोळ गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर (Four People Injured) जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी महाड ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कार मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जात असताना एकमेकांना धडकल्या. हा भीषण अपघात आज गुरुवारी महाड परिसरात झाला. कारमध्ये प्रवास करणारे नागरिक वडवली, गोरेगाव येथील नागरिक असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना महाड ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अपघाताच्या घटनेमुळं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारने महागाई भत्ता वाढवला, ३२ सरकारी कंपन्यांचा पगार इतका वाढणार

Maharashtra News Live Update: कृषी शिक्षणात महाराष्ट्र पडला मागे... राष्ट्रीय मानांकन यादीतून राहुरी कृषी विद्यापीठ ' आऊट '

पावसाळ्यात झुरळांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे हाकलण्यासाठी लगेचच करा 5 सोपे उपाय

Gold Rate Today : सोने खरेदीदारांच्या खिशाला कात्री, सलग चौथ्या दिवशी दरवाढ; आजचा ताजा भाव काय?

Paper Leak: मोदींची 'फास्ट ट्रॅक कोर्ट'ची घोषणा, राहुल गांधींचा पलटवार; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह केल्या 'या' ३ मोठ्या मागण्या

SCROLL FOR NEXT