Tourists Beaten in Nashik  Saam TV
महाराष्ट्र

Tourists Beaten in Nashik : धबधब्यावर मजा करायल गेले अन् सुजून आले, हुल्लडबाज पर्यटकांना सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण

Nashik Tourist Beaten Video : त्र्यंबकेश्वर - घोटी मार्गावरील पहिणे गावातील काल दुपारी ४ वाजेची ही घटना आहे.

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

Nashik News : पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीच असतं. पर्यटकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणी वळतात. मात्र पर्यटनस्थळी बेशिस्त पर्यटकांचीही कमी नसते. अशा हुल्लडबाजांमुळे पर्यटनस्थळी अनेकदा असुरक्षिततेची भावना इतर पर्यटकांना होते. मात्र नाशिकमध्ये अशा हुल्लबाजांना सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी चोप दिला आहे. त्र्यंबकेश्वर - घोटी मार्गावरील पहिणे गावातील काल दुपारी ४ वाजेची ही घटना आहे. नेकलेस धबधब्यावर काही पर्यटक धिंगाणा घालत हुल्लडबाजी करत होते. काही टवाळखोर याठिकाणी मद्यसेवनही करत होते अशी माहिती वन विभागाली मिळाली होती. (Maharashtra News)

त्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि काही पर्यटकांना सुरु असलेल्या गैरप्रकारवरुन चांगलाच धडा शिकवला आहे. यावेळी वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या लाठीहल्ल्याबाबत काही जणांनी जाबही विचारला. अशी मारहाण कशी करु शकता असा सवालही काहींनी विचारला. मात्र सुरु सुरक्षारक्षकांना काहीही न ऐकता हुल्लडबाजांना चांगलाच प्रसाद दिला आहे. (Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT