Beed Crime News: समाजात हुंडाप्रथा अजूनही कायम आहे. हु्ंड्यासाठी अजूनही विवाहितेचा छळ केला जातो. बीड जिल्ह्यातील एका विवाहितेचा हुंड्यासाठी प्रचंड छळ करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही विवाहिता गर्भवती होती, पण हुंड्यासाठी तिच्या पतीनं पीडितेचा जबरदस्ती गर्भपात केला. पतीने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन पत्नीच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे.
या पतीने पीडित पत्नीकडे 10 लाख रुपये हुंडा घेवून ये, अशी मागणी केली. एवढचं नाही तर त्याने तिला बेल्टने मारहाण करून हुंड्यासाठी (dowry) छळ केला आहे असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यावरुन पतीसह सासू-सासऱ्यांवर संमतीशिवाय गर्भपात आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुचिता ऋषीकेश नागरगोजे रा. गजानन विहार, कालिकानगर, बीड (Beed) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. शहरातील एका सुशिक्षित कुटुंबात हा सगळा प्रकार घडल्याने हुंड्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 12 मे 2019 ला सुचिताचा विवाह ऋषीकेश नागरगोजे याच्याशी झाला. ऋषीकेश हा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पीडितेचे सासरे भागवत दशरथ नागरगोजे हे जिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून काम करतात, तर पीडितेची सासू अनिता भागवत नागरगोजे या शिरूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. लग्नात सुचिताच्या आई-वडिलांनी सहा लाख 17 हजार 199 रुपयांचे 19 तोळे दागिने आणि संसारोपयोगी साहित्य दिले होते.
सुचिता गर्भवती झाल्याचे कळाल्यावर ऋषीकेशने तिला दवाखान्यात नेले नाही. सतत दीड महिना त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तिला गोळ्या खायला दिल्या. यामुळं तिचा रक्तस्राव वाढला, त्यानतंर तिचा एका खासगी रूग्णालयात गर्भपात केला. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.