धक्कादायक! गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! गुंगीच्या गोळ्या देऊन महिलेवर अत्याचार

परळी तालूक्यात हा धक्कादायक प्रकार घडला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीडच्या परळी तालुक्यात (Beed-parali) एका विवाहित विधवा महिलेला, गुंगीच्या गोळ्या बळजबरीने खाऊ घालून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार 25 जुलै रोजी परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे घडली आहे.

याविषयी परळी ग्रामीण पोलीस म्हणाले, की परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील 40 वर्षीय महिला, आपल्या पतीच्या निधनानंतर 2 मुले व 1 मुलगी यांचा मजुरी करून सांभाळ करत आहे. याच असहायतेचा फायदा घेत, गल्लीतील 27 वर्षीय युवक अफसर शेख याने, 25 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश करून, तिला मारहाण करीत गुंगीच्या गोळ्या खाऊ घालून अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 376, 452, 323 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होतं असल्याने मुंडेंच्या जिल्ह्यात चाललंय काय ? असचं म्हणण्याची वेळ आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT