राजेश टोपे  SaamTv
महाराष्ट्र

राज्यात डेल्टा प्लस रुग्णसंख्येत वाढ झाल्याची टोपेंची कबुली !

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 21 वरून ही रुग्णसंख्या 45 वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 21 वरून ही रुग्णसंख्या 45 वर गेली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र, या रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आले असून त्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जाणार असल्याने कुठल्या ही प्रकारे घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केले.

हे देखील पहा -

मुंबई, रत्नागिरी, ठाणे, जलगाव व पुणे येथे रूग्णसंख्या जास्त असल्याचं देखील टोपे यांनी म्हटलंय. मराठवाड्यात देखील डेल्टा प्लस चा शिरकाव झाला असून औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात ही एक एक रुग्ण आढळून आला असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून 100 सॅम्पल घेतले जात असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी मध्ये त्या सॅम्पलची हॉल जिनोमिक सिक्वेन्सीकच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. या मध्ये म्युटेशनची तपासणी केली जात असताना ही रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले असल्याची कबुली त्यांनी दिली.

डेल्टा प्लस रुग्णांची प्रवासाची पार्श्वभूमी चेक केली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जात असल्याचे टोपे म्हणाले. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर असून दररोज साडेपाच हजारांपासून ८ हजारापर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. ज्या जिल्ह्यात निर्बंध अजूनही कायम आहे तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन टोपे यांनी केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT