महाराष्ट्र

Tomato Farmer Success Story : टोमॅटो विकून कमावले २.८ कोटी, पुण्याच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा

Pune Farmer Ishwar Gaykar : ईश्वर गायकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

प्रविण वाकचौरे

Tomato Price : देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. मात्र या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र मालामाल झाला आहे. टोमॅटोमुळे पुण्याली जुन्नर येथील एक शेतकरी कोट्यधीश बनला आहे.

ईश्वर गायकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ईश्वर यांनी टोमॅटोच्या पिकातून यंदा आतापर्यंत 2.8 कोटींची कमाई केली आहे. तर ही कमाई आणखी वाढून तीन ते सव्वातीन कोटींपर्यंत जाईल अशी अपेक्षा ईश्वर यांना आहे. (Maharashtra News)

12 एकरात टोमॅटोची लागवड

ईश्वर गायकर यांनी मेहनत आणि जिद्द यातून एवढी कमाई केली आहे. सहा-सात वर्षांपासून ते आपल्या 12 एकर शेतीत टोमॅटोची लागवड करत आहेत. अनेकवेळा त्यांचं नुकसानही झालं आहे. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही.

2021 मध्ये 18-20 लाखांचंं नुकसान

दोन वर्षापूर्वी त्यांना टोमॅटोच्या शेतीत 18-20 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीने खचून न जाता त्यांना टोमॅटो लागवड थांबवली नाही. यंदा आतापर्यंत त्यांनी सुमारे 17,000 क्रेट 770 ते 2311 रुपये प्रति क्रेट या किमतीत विकले आहेत. यातून त्यांना 2.8 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

टोमॅटोला हमीभावाची गरज

अजून सुमारे 3000 ते 4000 क्रेट टोमॅटोची विक्री करण्याचा त्यांचा अंदाज आहे. यातून त्यांची कमाई 3.5 कोटींपर्यंत होईल अशी आशा आहे. टोमॅटोच्या पिकाला हमीभावाची गरज आहे. सरकारने टोमॅटोला प्रतिकिलो 30 रुपये भाव दिला तर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं. टोमॅटो व्यतिरिक्त ईश्वर हंगामानुसार कांदे आणि झेंडू फुलाचं उत्पन्न घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT