Vegetables Price List Today Saam TV
महाराष्ट्र

Vegetables Price List Today: टोमॅटोसह महागलेल्या भाज्यांच्या दरात मोठी घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

Today's Tomato Price: मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठाव नसून आवकही चांगली होत असल्याने आज दर काही प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळतंय.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Vegetables Price: नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये (APMC Vegetable Market) भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळतेय. चार दिवसांपूर्वीच शंभरी गाठलेले टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची यांचे दर आता 60 ते 80 रुपयांवर आलेत. (Latest Vegetables Price News)

तसेच इतरही सर्व भाज्यांचे दर 30 ते 40 टक्क्यांनी घसरलेत. मार्केटमध्ये भाजीपाल्याला उठाव नसून आवकही चांगली होत असल्याने आज दर काही प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळतंय. मात्र हीच परिस्थिती उद्याही असेल याबाबत मात्र व्यापारी शंका व्यक्त करतायत.

आज एपीएमसीमधील भाज्यांचे दर प्रति किलो

वाटाणा - 70 ते 80

टोमॅटो - 70 ते 80

फ्लॉवर - 20 ते 22

कारली- 40 ते 45

कोबी - 8 ते 12

दुधी - 40 ते 44

वांगी - 32 ते 36

काकडी - 26 ते 28

भेंडी - 40 ते 50

फरसबी - 60 ते 70

गाजर - 20 ते 24

ढोबळी मिरची - 40 ते 44

तोंडली - 60 ते 65

घेवडा - 56 ते 60

पालेभाजी प्रति जुडी दर

मेथी - 20

शेपू - 20

कोथिंबीर - 20

पालक - 20

कांदापात - 10 ते 15

मुळा - 20

गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांसह टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली होती. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशात आज नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात बदल झाला असून दर काही प्रमाणात कमी झालेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

SCROLL FOR NEXT