Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather : हिवसाळा आला रे! ऐन हिवाळ्यात पाऊस झोडपणार, हवामानाचा अंदाज काय सांगतो?

Maharashtra Weather Forecast : राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. गुरूवारपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात हवेची पातळी अतिशय खालावली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Weather Update : कडाक्याच्या थंडीनंतर राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरपासून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परिणामी 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामांतज्ञानी डिसेंबर आखेरीस होत असलेल्या वातावरण बदलावर अंदाज वर्तवला आहे.

मागील दोन आठवड्यात राज्यात कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या. पण आता ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होऊ शकते, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे.

दोन दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसत आहे. सोमवारपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढलेय. अनेकांना थंड-ताप अन् खोकल्याचा त्रास जाणवत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी हवेची पातळी अधिकच खालावली आहे. त्यामुनळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेय.

राज्यात अवकळीचा इशारा -

दक्षिणेकडून बाष्पीयुक्त वारं राज्यात येणार आहे, त्यामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे अवकाळी पावसासोबतच गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. केळी, द्राक्ष, पपई यासह भाजीपाल्याचे अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

नवीन वर्षाची सुरुवात थंडीने -

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. संक्रातीवेळी संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी असेल. डिसेंबरच्या अखेरीस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT