Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Today Winter Temprature : महाराष्ट्र गारठला! हुडहुडी भरली अन् शेकोट्या पेटल्या, धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; राज्यात कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असून हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. किमान तापमानात मोठी घट नोंदली जात आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला

  • मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज

  • हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

  • अनेक जिल्ह्यांत किमान तापमान १० अंशांखाली

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील शीत वारे पुन्हा राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा जाणवू लागला आहे. आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढू लागला असून, अनेक ठिकाणी थंडी दिवस अनुभवायला मिळत आहे. काल म्हणजेच रविवारी परभणी येथील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ५.८ अंश सेल्सिअस, निफाड येथे ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगरमध्ये ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर जेऊर आणि गोंदिया येथे तापमान ८ अंशाच्या खाली आहे. पुणे, जळगाव, ‎‎मालेगाव, ‎परभणी, अमरावती, ‎नागपूर, यवतमाळ येथे ९ अंशांपेक्षा कमी असून ‎‎नाशिक, भंडारा, ‎वर्धा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान?

  • धुळे : ५.८

  • अहिल्यानगर: ६.५

  • पुणे: ८.४

  • जळगाव: ९.०

  • कोल्हापूर: १४.८

  • महाबळेश्वर: १२.०

  • मालेगाव: ८.२

  • नाशिक: ९.२

  • सांगली: १२.९

  • सातारा: १२.८

  • सोलापूर: १३.६

  • छत्रपती संभाजीनगर: १०.२

  • परभणी: ८.९

  • बीड: ८.९

  • अकोला: १०.१

  • अमरावती: ९.०

  • बुलढाणा: १२.२

  • गोंदिया: ८.०

  • नागपूर: ८.२

  • वर्धा: ९.४

  • यवतमाळ: ८.५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT