"माझ्या जीवनात सगळ्यात उत्तम जेवण आज जेवले" ऊसतोड मजुरांसोबत मुंडेंचं स्नेहभोजन विनोद जिरे
महाराष्ट्र

माझ्या जीवनात सगळ्यात उत्तम जेवण आज जेवले - पंकजा मुंडे

राजकारण्यांनी वाढदिवस, सण उत्सवाचा तमाशा करून ठेवला असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

विनोद जिरे

बीड : आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा येथे पंकजा मुंडे थेट ऊसतोड मजुरांच्या पालावर गेल्या. त्यांनी ऊसतोड मजूर महिलांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पंगतीला जेवणही केले. यावेळी त्या म्हणाल्या, आजपर्यंतच्या माझ्या जीवनात मी पहिल्यांदा, सगळ्यात उत्तम जेवण जेवलेय. माझ्यासाठी महिलांनी आज खूप चांगलं जेवण बनवलं होतं. त्यांच्या खुप समस्या आहेत. धान्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे मी ऊसतोड कामगारांवर एक ड्राफ्ट तयार करून मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे. अशी भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त थेट ऊसाच्या फडातून व्यक्त केलीय.

हे देखील पहा :

ऊसतोड मजुरांच्या वाट्याला आलेली शिळी अर्धी भाकरी मी खाल्ली आहे. ऊसतोड मजुरांच्या समस्या आणि प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या सुख दुःखात मी सोबत आहे. राजकारणात फक्त गाजावाजा होतो. कोणताही सण-समारंभ दिवस, वाढदिवस त्याचा राजकारणी तमाशा करून ठेवतो. अशी खंत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. तसेच ऊसतोड मजुराला आतापर्यंत काहीही मिळालेले नाही अशी कबुली देखील पंकजा मुंडे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, की ओबीसी आरक्षण स्थगितील, आंदोलन करून, उपोषण करून ते मिळवता येणार नाही. तर, त्याला कायद्याने उत्तर द्यावं लागेल, आणि आम्ही देऊ. त्यामुळं ओबीसी आरक्षणासाठी सरकारने स्पेशल अधिवेशन घ्यावे. लागलेल्या निवडणुका रद्द करा अन पुन्हा निवडणूका घ्या. या निवडणूका रद्द करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी सरकारकडे केली आहे.

ऊसतोड मजुरांच्या महामंडळा संदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, योजनांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचं काहीच होत नाही. अद्यापपर्यंत ऊसतोड मजुरांची नोंदणी झालेली नाही. लसीकरण देखील पूर्ण झालेले नाही. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न देखील मोठा आहे. मुलांच्या शाळा, वसतिगृह याचबरोबर अनेक समस्या त्यांच्या आहेत, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांनी माझं खूप मोठं स्वागत केलं, प्रेम दिलं, चेहऱ्यावर हसू ठेवून त्यांनी आपले प्रश्न मांडले. राजकारणाच्या पलीकडे आज वेगळा आनंद मला मिळाला. माझ्यासाठी त्यांनी छान स्वयंपाक केला. मी त्यांच्यासोबत जेवण केलं. ऊसतोड मजुरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या दिग्गज नेत्याचा हरिद्वारमध्ये मृतदेह सापडला, राजकारणात खळबळ

ITR Filling 2026: आयटीआर फाइल करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक; आताच तयार ठेवा, अन्यथा येईल अडचण

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT