"हे किरायचं मंत्री पद''; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका Saam Tv
महाराष्ट्र

"हे किरायचं मंत्री पद''; पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर जहरी टीका

26 जानेवारी पासून ओबीसी आणि मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात दौरा करणार

विनोद जिरे

बीड : धनंजय मुंडे यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात 2 वर्षात एकदाही स्टेटमेंट दिले नाही. त्यानां ओबीसीच (OBC Meservation ) देणं घेणं नाही? असा गंभीर आरोप भाजप (BJP ) नेत्या पंकजा मुंडेनी (Pankaja Munde) यांनी भाऊ धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन 26 जानेवारीपासून, मी महाराष्ट्राचा (Maharashtra) दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, की ही निवडणूक (Election) ओबीसीसाठी काळी निवडणुक आहे.

हे देखील पहा-

ओबीसीचे आरक्षण गमावून महाविकास आघाडीचे नेते भाषण करतात. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होते, हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडी सरकारने (government) 2 वर्षात फक्त तारखा दिल्या, काहीच केले नाही आणि आता महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात, असे पंकजा मुंडे म्हणल्या आहेत. बीडच्या (Beed) पाटोदा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत त्या बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजप आमदार सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे यांची उपस्थिती होती. तसेच सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मराठा समाजाला आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत फेटा आणि हार घालणार नाही, असा प्रण असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. महाविकास आघाडी सरकार हे तीन पार्टीचे सरकार आहे, तुम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही.

एक पक्ष एक बोलतो तर दुसरा पक्ष रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो. त्यामुळे त्यांना जनता रस्त्यावर आणल्या शिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडेंनी 2 वर्षात जे नारळ फोडले, ते देखील मी मंजूर केलेली कामे आहेत. तुमच्याकडे जास्त पैशे झाले असतील तर ओबीसी आरक्षणासाठी पैशे द्या, तुमचे राज्यात काही चालत नाही, मतदार संघात काही चालत नाही, हे किरायचे मंत्री पद आहे. असा घणाघात पंकजा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेवर यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT